माननीय सागर सर
कालपर्यंत आनंदाचा पर्व उत्तम रीत्या पार पडला. सर आपले विचार ,कार्य महान आहे. तुमच्या कार्य प्रणालीला त्रिवार वंदन.
( किती पैसे मिळतात?) या विषयी सर असे वाटले की लोक आम्हाला विचारीत असणार पण तुम्हाला सुद्धा लोक असे प्रश्न विचारू शकतात. खरंच किती विचित्र वाटते असे काही विचार , सर सर्व काही पैशाने मोजले जातात का ?आत्म सुखाला काही महत्त्व आहे या गोष्टीची जाणीव अशा लोकांना मुळातच नसावी का ? एका साहित्यकाला व्यासपीठ मिळाले हेच आमचे महाभाग्य समजतो कारण कलेला पारखणारा हा कलावंत असू शकतो.आपल्यासारखे गुरुवर्य मिळाले नसते तर कदाचीत कागद कचरा म्हणून राहिला असता. मी किंवा एक साहित्यिक लोक आपल्या साहित्यिक परिवारांमध्ये खूप खुश आहोत. जिथे एकाकी कोणीच नसतं सुख दुःखाच्या पलीकडे विश्व असेल तर ते फक्त मनाचा साहित्य.जिथे फक्त आनंदाचे हिंदोळे असतात आणि त्या आनंदाच्या हिंदोळ्यावर दिवसा मागून दिवस कसे निघतात कळत नाही .वर्ष कसे निघून जातात तेही कळत नाही. जसे जगण्यासाठी प्राणवायुची गरज शरीराला असते .तसेच लिखाण म्हणजेच आमच्यासाठी तो जणू प्राणवायू आहे. शेवटच्या क्षणी पेशंटला सुद्धा जगण्याची आशा लावून देत असेल तर ते एकमेव औषध , प्राणवायू. तसेच लेखकाला वाचन लेखन जणू त्याचे प्राण.म्हणूनच म्हणतात ‘वाचाल तर वाचाल ‘ जशी औषधी रोगांवर नियंत्रण ठेवतात तसेच लेखन ,वाचन सुद्धा दुःखाला बाहेर काढण्यासाठी रामबाण औषध आहे याचे जिवंत उदाहरण म्हणजे गुरुवर्य आदर्श मा.निलांबरी गानू मॅडम तसेच मा.अरुण पौराणीक सर यांची उदा. आपल्यासाठी प्रेरणादाई ठरू शकतात.
धन्यवाद.
सौ. मंजुषा चिटटवार.
हिंगणघाट.