ArLiEn Kaviyon Ka Adhyatma Pvt.Ltd.
4 ऑक्टोबरला माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जो ऑनलाईन सादरीकरणाचा घाट घातला होता तो बघून मला हे निश्चित माहिती झाले की माझ्यावर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांचा किती मोठा गोतावळा माझ्यासोबत आहे. आपल्या संस्थेचे संस्थापक डॉ सागर गुडमेवार सर त्यांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, त्याचं असं आहे की ते वयाने जरी लहान असले तरी त्यांनी सर्वांना एकवटून ठेवण्याचा जणू विडाच उचललेला आहे. अगदी कमी वयात त्यांनी संस्थेची इतकी मोठी जबाबदारी स्वतःवर घेऊन प्रत्येक साहित्यिकांना जुळवून ठेवण्याचे कार्य हाती घेतले आहे. सागर सरांची जेव्हा मी स्वच्छ मनाने प्रशंसा करतो तेव्हा इतर साहित्यिकांचा अनादर करतो असं अजिबात नाही. कारण त्यांच्यासोबत जुळलेले राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपेश रुके सर हे नेहमी प्रत्येक कार्यक्रमात सोबत राहण्याचा यथोचित प्रयत्न करतात ते जमेल तेवढे प्रयत्न करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात त्यांचा मितभाषीपणा, तसाच त्यांचा सोज्वळ स्वभाव हा मनाला भावून जातो. याव्यतिरिक्त सर्वांच्या लाडक्या ताई लक्ष्मी रेड्डी यांच्या बद्दल काय बोलू त्या प्रत्येक कार्यक्रम घेण्यामध्ये इतक्या उत्सुक असतात की मला वाटते की प्रत्येक कार्यक्रम म्हणजे त्या आपल्या घरी असलेले लग्न समजतात. म्हणजे त्यांचा उत्साह इतका दांडगा आहे की जेव्हापण कोणताही कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले तर वारंवार वारंवार एकमेकांशी संपर्क साधून कार्यक्रम अधिकाधिक किती रंगीत आणि सुंदर होणार हा प्रयत्न करत असतात. त्यांनी निश्चित केले होते की राजेश सरांना म्हणजे मला कार्यक्रम घेण्यात येणार आहे याची माहिती द्यायची नव्हती. त्यांनी यथोचित प्रयत्न केलेत की मला सायंकाळी पाच वाजता माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आहे ही माहिती लपवून ठेवण्याची. परंतु आपण सर्व साहित्यिक माझ्यावर इतका स्नेह दाखवता की मला न सांगता घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा आधीच देऊन दिला होता. जवळपास तीन ते चार कवयित्रींचा कार्यक्रमाच्या पूर्वीच फोन आला होता की चार तारखेला पाच वाजता कार्यक्रम आहे. तुम्ही हजर राहणार आहात ना? आता ही गोष्ट मला सांगायची नव्हती हे माझे साहित्यिक स्नेही विसरून गेलेत आणि मला आपसूकच त्यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मिळाली. मी तर म्हणतो आपण सर्वांनी इतकं गुपित ठेवून कार्यक्रम अरेंज केला पण त्यांनी मला सांगितले यात अजिबात वावगे नाही. कारण की त्यांचे माझ्यावर असलेले प्रेम इतके अफाट आहे की ते हे सिक्रेट लपवून ठेवू शकले नाही. सायंकाळी पाच वाजताची वेळ माझी तर धावपळीची असतेच शिवाय बऱ्याच जण त्या वेळेत आपल्या आपल्या वेगवेगळ्या कामात असतात. तरीही सर्व साहित्यिकांनी मिळून या कार्यक्रमाला यशस्वी करण्यामागे पुरेपूर प्रयत्न केले आणि अगदी सुपर डुपर हिट कार्यक्रम तयार झाला. स्पर्धा समूहाच्या मूळ सूत्रधार कांचन निवे ताई त्यांचे इथे मोबाईल कव्हरेज नसून सुद्धा जास्तीत जास्त वेळ उपस्थित राहण्याचा प्रयत्न करत होत्या. आमच्या लाडक्या सोनाली ताईंनी सूत्रसंचालन करून अगदी रंगीतमय मैफिल निर्माण केली होती. तसेच आदरणीय प्रतिभाताई लाटकर, आदरणीय म्हाळसाकांत देशपांडे सर या व्यतिरिक्त माया यावलकर ताई, पांडुरंग कुलकर्णी सर, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष नितीन खंडागळे दादा आणखी बरेच साहित्यिक सादरीकरण करून माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत होते. मी तर नेहमीच म्हणतो की मी या साहित्य क्षेत्रात विद्यार्थी आहे आणि विद्यार्थीच राहणार. माझा परिचय सांगायला गेला तर मी राजेश नागुलवार, राहणार अमुक ठिकाणी आणि अमुक अमुक शिक्षण झालेला. या व्यतिरिक्त माझा काहीच विषेश परिचय नाही. तरीही आपण सर्वांनी माझ्यावर कविता रचून माझ्या मनाला भारावून टाकले. हे सर्व मला मिळत आहे ते स्वर्ग सुखापेक्षा कमी नाही असे मला वाटते. आमच्या मंजुषा ताई चिटटवार यांनी तर मला सकाळीच त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे मी सायंकाळी त्यांच्या घरी मेजवानी करायला पोहचलो. याशिवाय प्रत्यक्ष साहित्यिकांनी कविता सादर करताना मला शुभेच्छा देऊन स्नेह वाटत गेलेत. खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की कवियों का अध्यात्म या संस्थेचा एक भाग आहे. आपण आपले स्नेह आणि समूहाप्रति असलेले प्रेम असेच कायम अबाधित ठेवूयात.
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त केलेल्या अथवा रचलेल्या या सुंदर अशा मैफिलीचा मी आस्वाद घेतल्यानंतर कुणाचेही आभार न मानता प्रत्येकाच्या कायम ऋणात राहू इच्छितो..
राजेश नागुलवार उर्फ राजमन
(महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष).