ArLiEn Kaviyon Ka Adhyatma Pvt.Ltd.
सन्माननिय कवी आणि कवयित्री आपण आदरणीय सागर सरांच्या वाढदिवसानिमित्त ऑनलाइन झालेल्या कार्यक्रमात मला
प्रमुख अतिथी म्हणून सन्मान दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो.
सन्माननीय सागर सर,
या सागराच्या भल्या मोठ्या लाटा त्यात तरंगणाऱ्या तुमच्या बेधुंद कवितेला माझा सलाम. तुम्ही जोडलेल्या सर्व गोड नात्यांना सोबत घेऊन चालत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून कौतुक. म्हणतात ना मूर्ती लहान पण कीर्ती महान, पण माझं तुमच्याबद्दलचे मत थोडे वेगळे आहे. सर तुमची उंची पण महान आहे आणि कीर्ती सुद्धा महान आहे. तुम्ही हाती घेतलेला वसा खूप छान प्रकारे चालवत आहात, तुम्ही एकटेच चालवत नाही तर आपल्या सर्व प्रेमाच्या माणसांना एकत्र घेऊन चालवत आहात, याचा जास्त अभिमान वाटतो. कालच्या वाढदिवसानिमित्त आपण एकमेकांशी बोलत होतो पण सर तुमचं बोलणं वेगळं होतं, सर्वांशी बोलताना प्रेम, आपुलकी व आदर प्रकर्षाने जाणवत होता. सर्वांप्रति असलेला आदर तुमच्या डोळ्यात दिसत होता. अगदी सहजपणे तुम्ही कुठेही टाळाटाळ न करता सगळ्यांशी प्रेमाने बोलत होतात. आपण एकमेकांसाठी नवीन आहोत हे मुळीच जाणवले नाही. यशाची इतके मोठे शिखर गाठत असताना तुमचे पाय मात्र जमिनीवरच आहेत हे सारखे जाणवले. आपण एक खूप चांगली व्यक्ती आहात, आपला स्वभाव गोड कवितेच्या चारोळ्या सारखा आहे. सर तुमचं हे मनमुराद आणि आणि स्वच्छंदी जीवन फार आवडले. किनाऱ्यावरून सागराकडे जात असताना तुमच्या पाऊलखुणा खुप मोठ्या यशाच्या महासागराकडे प्रस्थान करीत आहेत. तुमच्या अंगी असलेली कवी, साहित्यिकाची ओढ आणि तुमच्या मधला सच्चा माणूस याच्या बळावर तुम्ही जगभरात फार मोठे यशस्वी कवी होणार यात काही शंका नाही.तुमच्या नावातच सागर आहे. या सागराच्या कवी लाटेतून लवकरच यशाचा महासागर व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शिटी वादक रुपेश मुरुडकर
मुंबई – महाराष्ट्र